आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकास मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- मग्रारोहयोचे काम सुरू का करत नाहीत म्हणून ग्रामसेवकास शिवसैनिकांनी चपलांनी मारहाण केल्याची घटना बीड येथील पंचायत समितीच्या आवारात बुधवारी दुपारी साडेबारा वाजता घडली. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, ग्रामसेवकांनी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे.

बीड तालुक्यातील अंजनवती येथील ग्रामसेवक बळीराम चव्हाण हे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता जन्म-मृत्यू नोंदणी मासिक अहवाल दाखल करण्यासाठी पंचायत समितीत गेले होते. त्या वेळी तेथे शिवसेनेचे पदाधिकारी बाळासाहेब माेरे, रामहरी सीताराम येडे व अन्य एक असे तिघे आले. ग्रामसेवक चव्हाण यांना तुम्ही मग्रारोहयोची कामे सुरू का करत नाहीत, असे विचारून शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर संतापाच्या भरात चव्हाण यांना चपलांनी मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पंचायत समितीच्या आवारात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
काम बंद आंदोलन
बीड पंचायत समितीत दुपारी ग्रामसेवकाला मारहाणीची घटना घडल्यानंतर सर्वच ग्रामसेवकांनी एकत्र येऊन काम बंद करून थेट शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले.
बातम्या आणखी आहेत...