आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘परळी-बीड’ रेल्वेमार्गासाठी हवेत 12.25 कोटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - परळी-बीड-नगर रेल्वेमार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणाचे 97 टक्के काम पूर्ण झाले असून, अतिरिक्त भूसंपादनासाठी 12.25 कोटी रकमेचा निधी एक वर्षांपासून रेल्वे विभागाकडे प्रलंबित आहे. निधीअभावी 7 कि.मी. जागेचा ताबा देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण झालेली नाही.

परळी-बीड-नगर या बहुचर्चित रेल्वेमार्गाचे काम अनेक वर्षांपासून निधीअभावी रखडलेले आहे. एकूण प्रकल्प 261.250 कि.मी. चा असून, नगर ते नारायणडोह या 15 कि.मी. मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. परळी ते नारायणडोह या 246.375 कि.मी. अंतराचे काम अद्याप व्हायचे आहे. नगर जिल्ह्यातील 3 गावांमधील जमीन अधिग्रहणाचे काम शिल्लक होते. तेथे पाच कि.मी. 563 मीटर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले.

बीड जिल्ह्यातील भूसंपादनाची सद्य:स्थिती
बीड जिल्ह्यात भूसंपादनाचे एकूण प्रस्ताव 97 असून, अंतिम निवाडा जाहीर करून मावेजा वाटप झालेली प्रकरणे 95 इतकी आहेत. भूसंपादन कार्यवाही स्तरावरील प्रकरणांची संख्या 2 इतकी आहेत. रेल्वे मार्ग बदलामुळे नवीन प्राप्त भूसंपादनाचे प्रस्ताव 5 आहेत. याव्यतिरिक्त नवीन प्राप्त भूसंपादनाचे प्रस्ताव 9 आहेत.

भूसंपादनाची तालुकानिहाय प्रकरणे - आष्टी, पाटोदा व शिरूर तालुक्यात 50 प्रकरणे निकाली निघाली असून एकूण अंतर 134.212 कि.मी. इतके आहे. बीड तालुक्यातील 20 प्रकरणे असून, अंतर 43.083 कि.मी. इतके आहे. वडवणी व धारूर तालुक्यातील अधिग्रहणाच्या प्रकरणांची संख्या 16 असून, अंतर 36.792 इतके आहे. परळी (वै) तालुक्यातील 11 प्रकरणे जमीन अधिग्रहणासाठी असून एकूण अंतर 26.725 इतके आहे.

प्राप्त निधीतून वाटप : जमीन अधिग्रहणासाठी एकूण 45.89 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, एकूण खर्च 44.36 कोटी रुपये झाला आहे. वाटपासाठी 1 कोटी 53 लाख रुपयांची रक्कम शिल्लक आहे. अतिरिक्त 12 कोटी 25 लाखांचा निधी मागण्यात आला आहे.