आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंदन चोराचा शॉकने मृत्यू; साथीदारांनी रुळांवर टाकले, पोलिसांनी लावला छडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शुक्रवारी सकाळी  परळी रेल्वे पटरीवर सापडलेल्या युवकाच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले. चंदनाची चोरी करण्यासाठी गेलेल्या युवकाचा चोरी करताना वीजेचे वायर तुटल्याने शॉक लागून मृत्यू झाला. घाबरलेल्या चारही साथीदारांनी त्याचा मृतदेह रेल्वेपटरीवर टाकून पोबारा केला. सकाळीच खूनाची खबर मिळाल्याने पोलिसही तपासाला लागले. आठवड्यात दुसरी खूनाची घटना घडल्याने परळी शहरात खळबळ उडाली होती.  बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने दोन साथीदारांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवल्यानंतर खरा प्रकार समोर आला.  
 
परळी शहरातील नव्याने झालेल्या संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत याच आठवड्यात एका वृद्धाचा खून करण्यात आला होता. त्याचा मृतदेह मिळून आल्यानंतर चोरट्यांनी हा खून केल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही तोच याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी रेल्वेच्या गेट क्रमांक २५ जवळ शेख सलमान शेख अलाउद्दीन (२५, रा. जुना रेल्वे स्टेशन परिसर)  या  युवकाचा मृतदेह आढळून आला. खून करून मृतदेह टाकल्याचा प्राथमिक अंदाज असल्याने आणि आठवड्यात खूनाची दुसरी घटना घडल्याने परळीकरांमध्ये चांंगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, उपअधीक्षक विशाल आनंद, पीआय उमेश कस्तुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पाठोपाठ बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथकासह पोहचले आणि तपास सुरू केला. हा प्रकार खूनाचा नसल्याचे  आहेर यांच्या लक्षात आले आणि  एलसीबीने अधिक चौकशी केली. सलमानचा साथीदार अजिज शेख याला एलसीबीने ताब्यात घेत चौकशी केली अाणि खरा प्रकार समोर आला.
 
असा लागला तपास : बीड येथील  एलसीबीचे पीआय दिनेश आहेर, एपीआय सचिन पुंडगे हे या घटनेचा तपास करत होते. मृतदेहाच्या अवस्थेवरुन शॉक देऊन खून केल्याचा पोलिसांचा अंदाज होता. तपासही सुरू करण्यात आला होता, परंतु रात्री सलमानसोबत त्याचे काही मित्रही होते अशी माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. यावरुन चौकशी करत पथकाने अजिज इस्माइल शेख याला ताब्यात घेतले. अजिजने एलसीबी पथकालाही काहीच माहिती नाही, सलमानच्या खूनाने आपणच आश्चर्यचकित झाल्याचे सांगितले. परंतु त्याच्या बोलण्यात येणाऱ्या विसंगतीवरुन पोलिसांचा संशय बळावला व खाक्या दाखवताच त्याने घटना सांगितली.  
 
दोन जण ताब्यात  
या प्रकरणी  एलसीबीने अजिज इस्माइल शेख आणि सय्यद बरकत या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना संभाजीनगर पोलिसांच्या हवाली केले. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...