आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातात तीन ठार, नऊ जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - आठवडी बाजार आटोपून मोरगावकडे निघालेला प्रवासी रिक्षा (एमएच 23 डब्लू 423) चालकाचा ताबा सुटल्याने झाडावर आदळून तीन ठार व नऊ जण जखमी झाले. हा अपघात रविवारी नेकनूर-मांजरसुंबा मार्गावर गवारी पाटीजवळ घडला.
यात शेषेराव गंगाराम कागदे (65), खाजाबी मेहबूब शेख (50, दोघे रा. मोरगाव) व भीमराव राघोजी चव्हाण (65, रा. उदंडवडगाव) या तिघांचा मृत्यू झाला. रामदास गहिनीनाथ येडे, बाबूराव काशीनाथ भड (दोघे रा. मोरगाव) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयातून औरंगाबाद येथील रुग्णालयात हलवले आहे. उर्वरित जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिस जमादार शंकर राठोड, शिपाई के. पी. पोतदार यांनी जखमींचे जवाब घेतले.