आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड आरटीओचे ११ लाख लुटणारा युवा रिपाइंचा जिल्हाध्यक्ष जेरबंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अकरा लाख रुपये लुटीच्या प्रकरणात शुक्रवारी सकाळी येथील युवा रिपाइंचा जिल्हाध्यक्ष मुख्य आरोपी नुरुलखान याला बीड येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जालना रोडवरील तुळजाई हॉटेलातून अटक केली. या प्रकरणात आणखी तीन आरोपी फरार आहेत. तब्बल १७ महिन्यांनंतर या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गळाला लागला आहे.

बीड येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील ११ लाख हजार रुपयांची रक्कम ३० मार्च २०१५ रोजी रोखपाल मोहंमद ताहेर चौधरी हे बीड येथील बँकेत भरण्यासाठी घोसापुरी शिवारातून रिक्षाने प्रवास करत होते. बीड शहराकडे येताना दुपारी तीन वाजता दुचाकीवरील तीन जणांनी चालकाला चाकूचा धाक दाखवून रिक्षा थांबवली. त्यानंतर चौधरी यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील ११ लाखांची रक्कम लांबवली होती. या प्रकरणात एकूण आठ अारोपी असल्याचे समोर आले. महिनाभरापूर्वीच बीडच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने वेगवेगळ्या ठिकाणांहून असद बाबू शेख, इब्राहिम खान मोहब्बत खान, कपिल खान जहीर खान, वसीम वजीर शेख या चार जणांना अटक केली होती. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली यापूर्वीच दिलेली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी नुरुल खान कादर शेख याच्यासह अन्य दोन आरोपी फरार होते. दरम्यान, नुरुल खान हा बीडला त्याच्या किल्ला मैदान परिसरात आल्याची माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी त्याला तुळजाई हॉटेलातून जेरबंद केले.

११ लाखांपैकी फक्त६० हजार रुपये वसूल
आरटीओची ११ लाख हजार रुपयांची रक्कम लुटून आठही आरोपींनी पैशांमधून गोव्यात मौजमजा केली. मागील १७ महिन्यांत पोलिसांना फक्त रोख ६० हजार रुपये एक कार जप्त करण्यात यश मिळाले आहे. सर्व आरोपींना अटक झाल्यावरच उर्वरित रक्कम मिळेल, अशी आशा पोलिसांना आहे.

आरोपी कारागृहात
महिनाभरापूर्वी दरोडा प्रतिबंधक पथकाने पकडलेले असद बाबू शेख, इब्राहिम खान मोहब्बत खान, कपिल खान जहीर खान, वसीम वजीर शेख हे चारही आरोपी सध्या बीड जिल्हा कारागृहात आहेत.

नुरुल खान मास्टरमाइंड
बीड येथील आरटीओ कार्यालयातील अकरा लाख हजार रुपयांची रक्कम लांबवण्यासाठी कोठे थांबायचे, कॅश कोणी पळवायची, चाकू हल्ला कसा करायचा, या गुन्ह्याचे प्लॅनिंगच नुरुल खान याने केले होते. त्यामुळे तो या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...