आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: केजमध्ये एक लाखाची विदेशी दारू जप्त; पोलिसांचा साई पॅलेसवर छापा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज: केज पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा अंबाजोगाई रस्त्यावरील साई पॅलेसवर छापा टाकून ९३ हजार पाचशे ९९ रुपयांची विदेशी दारु पकडली. पोलीसांनी एकास अटक करुन दोघांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशावरुन राष्ट्रीय व राज्य रस्त्यावरील दारु विक्रीची दुकाने, बार बंद करण्यात आले आहेत. मात्र केज-अंबाजोगाई या राज्य रस्त्यावरील साई पॅलेसवर चोरुन दारु विक्री होत असल्याची गुप्त माहिती केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांना मिळाली होती. 
 
शनिवारी रात्री साडे सातच्या सुमारास त्यांच्या पथकाने या बारवर अचानक छापा मारला. पोलीसांनी बारची झडती घेतली असता किंग फिशर, नॉक आऊट, मेगडॉल कंपनीसह विविध विदेशी दारुचे बॉक्स आढळून आले. ९३ हजार पाचशे ९९ रुपये किंमतींची विदेशी दारु जप्त करुन किसन तुकाराम खरात याला ताब्यात घेतले आहे. 
 
केज पोलिसांत बार मालक संदीप चौरे (रा.पिसेगाव), किसन खरात यांच्याविरुध्द गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईमुळे चोरुन दारु विक्री करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. जी. गाडेवाड, फौजदार सुरेश माळी, आनंद वाठोडे, जमादार रंगा राठोड, अशोक गवळी, जगजिवन करवंदे, पोलीस शिपाई हनुमंत चादर, राहूल नाडागुडे, वैभव राऊत, रामदास आवळे, हनुमंत गायकवाड, धन्यपाल लोंखडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
बातम्या आणखी आहेत...