आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरुर कसारा सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात ट्रॅप कॅमेरे; शिकारी, तस्करांवर करडी नजर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅप कॅमेऱ्याने कृष्णमृग(काळविठ) जोडीचे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आल्याचे पहिले छायाचित्र टिपले. - Divya Marathi
ट्रॅप कॅमेऱ्याने कृष्णमृग(काळविठ) जोडीचे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आल्याचे पहिले छायाचित्र टिपले.
शिरूर कासार (बीड) - वन्यजीवांची शिकार, तस्करी रोखण्यासाठी तसेच सर्व हालचालींवर पाळत ठेवण्यासाठी वन विभागामार्फत सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र येथील पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. प्रथमच अत्याधुनिक स्वयंचलित ट्रॅप कॅमेरे विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बसवण्यात आले. या ट्रॅप कॅमेऱ्याने कृष्णमृगाच्या जोडीचे पहिले छायाचित्र टिपले आहे.
 
वन्यजीव संरक्षणासाठी आधुनिकतेची कास
ट्रॅप कॅमेरा १०० फुटापर्यंत जंगलातील बारिक-सीरिक बाबींवर नजर ठेवणार आहे. दिवस रात्र हा कॅमेरा जंगलातील वन्यजीव व त्यांच्या शिकाऱ्यांवर, तस्करांवर करडी नजर ठेवून त्यांचे चेहरे सुद्धा सहजतेने टिपणार आहे. ज्या ठिकाणी कॅमेरा असेल त्या परिघातून कुणीही गेल्यास क्षणाचाही विलंब न होता ते चित्रबद्ध होतील. विशेष म्हणजे, छायाचित्र टिपताना वन्यजीव किंवा संशयित शिकाऱ्यांना याची कुठलीच कल्पना येणार नाही. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या कॅमेऱ्यात टायगर सेटींग असून कॅमेऱ्याच्या परिघातुन वन्यप्राणी गेल्यास १ ते ३ मिनीटापर्यंत सलग छायाचित्रांसह व्हिडिओ देखील काढले जातात. यात ८ जीबी एवढ्या क्षमतेचे मेमरी कार्ड असल्याने मोठ्या प्रमाणात छायाचित्र आणि व्हिडीओची साठवणूक होते. विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते व वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांनी ही दिली.
 
असंख्य वन्यजीवांचा निर्भय वावर
जिल्ह्यातील सर्पराज्ञी प्रकल्प हा वन्यजीवासाठी नंदनवन असून येथे लांडगे, तरस, कोल्हे, कृष्णमृग (काळवीट), खोकड, ससे, गरुड, घुबड आदी वन्यजीव मोठ्या प्रमाणात निर्भय वावरताना पाहावयास मिळतात. या परिसरात वाइल्ड लाईफ छायाचित्रकार वैजु पाटील यांनी काढलेल्या खोकडाच्या छायाचित्रांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद झाली आहे. सर्पराज्ञीत लावलेल्या या ट्रॅप कॅमेऱ्याने कृष्णमृग(काळविठ) जोडीचे पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी आल्याचे पहिले छायाचित्र टिपले असल्याची माहिती सर्पराज्ञीचे संचालक व वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...