आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई: कारच्या धडकेत नववीत शिकणाऱ्या सायकलस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- अहमदपूरहुन औरंगाबादला निघालेल्या कारने दिलेल्या धडकेत नववीत शिकणाऱ्या सायकलस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा येथे सोमवारी सायंकाळी वाजता घडला . विठ्ठल प्रभाकर अदाटे (वय १६) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे. 

सोमवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास विठ्ठल अदाटे या मुलगा सायकलवरून त्याच्या शेताकडे निघाला होता. पिंपळा धायगुड्या जवळील वीटभट्टीजवळ त्याची सायकल आली तेंव्हा समोरून येणाऱ्या कार क्रमांक (एम.एच. २० इ.इ. ३८२७) ने त्याला जोराची धडक दिली. यात विठ्ठल गंभीर जखमी झाल्याने त्याला स्वाराती रूग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. 

अहमदपूर येथील लग्न समारंभ आटोपून कार पिंपळा धायगुडा मार्गे औरंगाबादकडे निघाली होती. विठ्ठल अदाटे हा मुलगा त्याच्या आई सोबत मामाचे गाव असलेल्या पिंपळा धायगुडा येथेच रहात होता. तो स्वातंत्र्यवीर सावरकर शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. 

कार चालकाला अखेर पकडले 
अपघातानंतरकार चालक औरंगाबादच्या दिशेने फरार झाला. ग्रामस्थांकडून माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामिण ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस.डी. गिते यांनी दोन पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून कारचालक उदय वरकर याला लोखंडी सावरगाव येथे पकडले. पकडलेली कार औरंगाबाद येथील विजय गोसावी यांच्या मालकीची असुन अपघाताच्या वेळी कारमध्ये चालक उदय वरकर याच्यासह चार व्यक्ती होत्या. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...