आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अप्पर तहसीलदारास दोन वर्षांची सक्तमजुरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - कुळ म्हणून मिळालेल्या जमिनीच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र देण्यासाठी बारा हजार रुपये घेणारे लाचखोर अप्पर तहसीलदार मोतीलाल श्यामराव राठोड यांना येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पहिले श्रीपाद दिग्रसकर यांनी दोषी ठरवून दोन वर्षे सक्तमजुरी व तीन हजारांचा दंड ठोठावला. शनिवारी दुपारी न्यायालयाने हा निकाल दिला.
केज तालुक्यातील नायगाव येथील नरसिंगदास मगनलाल बाहेती यांना वडिलोपार्जित अकरा एकर चार गुंठे जमिनी मिळाली होती. जमिनीच्या मालकी हक्काचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर तहसीलदार मोतीलाल गायकवाड यांच्याकडे बाहेती यांनी अर्ज दाखल केला होता. बाहेतींना त्यांच्यासारखा निकाल देण्यासाठी गायकवाड यांनी 40 हजारांची मागणी केली होती. शेवटी बारा हजार रुपये देण्यावर तडजोड झाली. 11 एप्रिल 2005 मध्ये बीड येथील कार्यालयात गायकवाड यांना बारा हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपअधीक्षक गौतम देशमुख यांनी केला. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक गोवर्धन कोळेकर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर शनिवारी सुनावणी होऊन न्यायालयाने गायकवाड यांना दोषी ठरवून दोन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंड ठोठावला.