आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हीलचेअर बॅडमिंटनमध्ये बीडच्या काेमलला रौप्य, राष्ट्रीय स्पर्धेत घेतली दोन पदके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - बॅडमिंटन स्पाेर्ट‌्स आॅफ इंडिया, कर्नाटक पॅरा बॅडमिंटन असाेसिएशन व राेटरी क्लबतर्फे बंगळुरूत गुरुवारी झालेल्या राष्ट्रीय व्हीलचेअर बॅडमिंटन स्पर्धेत बीडच्या काेमल बाेरा हिने दाेन रौप्यपदके पटकावली. काेमलने वैयक्तिक स्पर्धेत काेलकात्याच्या वैशालीला हरवले. संयुक्त दुहेरीत पंजाबच्या संजीवकुमारच्या साथीने कर्नाटकचा पराभव केला. यापूर्वी तिने राज्य स्पर्धेत कांस्य, राष्ट्रीय स्पर्धेत दाेन पदके मिळवली आहेत.

पंजाब सरकारची भेट : संयुक्त स्पर्धेत काेमलने महाराष्ट्रासाठी व संजीवने पंजाबसाठी केलेल्या कामगिरीची दखल घेत पंजाब सरकारने काेमलला २५ हजार रुपये किमतीचे बॅडमिंटन क्रीडा साहित्य भेट दिले. पंजाब सरकारने काेमलचे काैतुक केले अाहे.