आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीडमध्ये अल्पवयीन भिक्षेकरी मुलीवर मोबाईल शॉपी चालविणाऱ्याकडून अत्याचार; मुलगी गर्भवती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- एका अल्पवयीन भिकारी युवतीवर मोबाईल शॉपी चालविणाऱ्या तरूणाने वारंवार अत्याचार केल्याने ती 6 महिन्यांची गर्भवती राहिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

 

 

शेख जावेद शेख सलिम (कबाडगल्ली) असे नराधमाचे नाव आहे. पीडिता ही केवळ 15 वर्षांची आहे. तिची आई बशिरगंज परिसरात भिक मागून पोट भरते. तिच्यासोबत तिची मुलगीही असे. मुलगी मोठी असल्याने तिच्यावर याच भागातील जावेदचा डोळा गेला. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याने मागील उन्हाळ्यापासून ते आजपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून ती गर्भवती राहिली.

 

 

दरम्यान, या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यांनी पीडिता व तिच्या आईची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेला विश्वास देत पोलिसांनी तिच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. यावेळी तिने आपल्यावर जावेदने वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर जावेदवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जावेदला तात्काळ बशिरगंजमध्ये ताब्यात घेतल्याचे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...