आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलवर सट्टा; लातुरात १६ जणांना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - शहरातील नांदेडरोड परिसरात हॉटेल यशोदीपवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या १६ जणांना अटक केली. याप्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एलसीबीच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरून सोमवारी रात्री छापा मारून पावणेतीन लाख रुपयांसह टीव्ही व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हॉटेलमालक सचिन बंडापल्ले याच्यासह जीवन राऊत, अशोक जाधव, जावेद पटेल, प्रकाश गडदे, दिनकर घुले, विजय माले, संतोष बेंबडे, प्रशांत स्वामी, गणेश सांगावे, विकास साबदे, बबन चन्नागिरे, एकबाल मोमीन, कासीम शेख, गणेश स्वामी, नवनाथ जंपनगिरे यांचा समावेश आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक डाबेराव यांनी केली.