आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडावर माेठा फाैजफाटा तैनात; पाेलिस, प्रशासकीय प्रयत्न व्यर्थ; तणावाचे सावट कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - भगवानगडावर राजकीय भाषण करण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद अधिक चिघळत चालला अाहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी व पाेलिस अधीक्षकांनी रविवारी गडावर जाऊन महंत नामदेवशास्त्री यांच्याशी बंदद्वार चर्चा केली. या चर्चेचा तपशील समजू शकला नसला, तरी डॉ. शास्त्री व पंकजा मुंडे अापल्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती अाहे. त्यामुळे मंगळवारी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गडावर शनिवारपासूनच चाेख बंदाेबस्त तैनात करण्यात अाला अाहे.
दरम्यान, दसऱ्याला होणाऱ्या संभाव्य तणावापासून संरक्षण व्हावे व दर्शनाची वारी चुकू नये, म्हणून राज्यातील विविध भागांतील भाविकांनी दर्शनासाठी दाेन दिवस अाधीच गडावर दर्शनासाठी गर्दी केली आहे. नवरात्र महोत्सवाची सांगता मंगळवारी होणार असल्याने भाविकांची संख्या अाणखी वाढणार आहे. दसरा मेळाव्यात गडावर अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी गडावर एक अतिरिक्त पोलिस अधीक्षक, तीन पोलिस उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, २१ सहायक निरीक्षक व फौजदार, ३२५ पाेलिस कर्मचारी, ७५ महिला पोलिस, दोन आरसीपी प्लाटून, दोन राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असतील. याशिवाय जिल्ह्याबाहेरून बंदोबस्त मागवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...