आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडावर सभेला बंदी; पायथ्याशीच पंकजांची सभा, प्रशासनाची भूमिका- दर्शन घ्या अन् जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारी भगवानगडावर बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे - Divya Marathi
मंगळवारी भगवानगडावर बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे
पाथर्डी/ बीड - भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात दसरा मेळाव्यावरून सुरु झालेल्या वादास सोमवारी वेगळी कलाटणी मिळाली. कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत अहमदनगर जिल्हा प्रशासनाने भगवानगडावरील आतील जागेत सभेवर बंदी घालून गड व परिसरात जमावबंदीचे आदेशही लागू केले.गडावर लाठ्या, काठ्या, झेंडे व अन्य प्राणघातक वस्तू नेण्यास सक्त मनाई केली. या आदेशानंतर आता पंकजांची सभा स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पहिला दसरा मेळावा घेतला होता त्या ठिकाणी म्हणजेच खरवंडी रोडवर गडाच्या पायथ्याशी होणार आहे.
वादाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गड व परिसराचा ताबा घेतला असून भगवानगडाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. राज्यातील
सर्वाधिक संवेदनशील विषय म्हणून सध्या या प्रश्नाकडे पाहिले जात आहे. परिस्थिती अतिशय स्फोटक झाल्याने प्रशासनाने अखेर सरकारमधील मंंत्र्याच्या सभेला परवानगी नाकारण्याचे धाडस दाखवले आहे.
दरम्यान, या वादाबाबत ग्रामविकंास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी सायंकाळी मोन सोडत मी नियम मोडणार नाही, पण नियमाप्रमाणे लोकांना संबोधित करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
आष्टी येथील दौरा आटोपून पंकजा बीडमध्ये सायंकाळी आल्या. दिव्य मराठीशी बोलतांना त्या म्हणाल्या की, मी उद्या भगवानगडावर भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. आजपर्यंत अनेक चर्चा वांदग झाले. मी मौन बाळगले होते. मी कोणतेही नियम मोडणार नाही. भगवानगडावर जमावबंदी आदेश आहे. याची मला कल्पना आहे. जेंव्हा मी पालघरला गेले होते. तेंव्हा तिथेही जमावबंदी आदेश लागू होता.त्या ठिकाणी रिक्स घेवून मी लोकांशी व विरोधकांशी संवाद साधला. परंतु भगवानगडावरील जमावबंदी आदेश मी उठवायला लावणार नाही.मी सत्तेत असले तरी सत्तेचा दुरूपयोग करणार नाही.मी लोकांना शांत राहण्यासाठी सूचना केल्या आहेत.

ऑडीओ क्लीप प्रकरणी पत्र :
माझ्या आवाजाची मोडतोड करून ऑडीओ क्लीप तयार करण्यात आली ती व्हायरल झाली. मी मुख्यमंत्र्यांकडे क्लीपची चौकशी करण्यासाठी लेटर दिले आहे. ती चुकीची क्लीप आहे.
महंताबद्दल मला आदर :
महंत नामदेवशास्त्री यांच्याबद्दल मला आदर आहे. मी गडाची कन्या आहे. मी कोणालाही धमकी दिलेली नाही. लोक संघटित राहीले पाहिजेत हीच माझी इच्छा आहे. उद्या मी भाषण करणार आहे. लोकांशी बोलणार आहे.असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.
पुढील स्लाइडमध्ये,
> गडाला छावणीचे स्वरूप, ३००० पोलिस तैनात
> दर्शन घ्या अन् जा
> मी जाणार, सभा घेणारच !
> काळजी करू नका सरकारचे लक्ष
बातम्या आणखी आहेत...