आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महंत नामदेवशास्त्रींना लोणीमध्ये गावबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिरूर - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना भगवानगडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध केल्याने महंत नामदेवशास्त्री यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात वातावरण ढवळले असून तालुक्यातील लोणीच्या ग्रामस्थांनी त्यांना गावबंदी केली. खंडोजीबाबा सप्ताहात काल्याच्या कीर्तनाला महंतांना बोलावले जाणार नाही. त्यामुळे परंपराच मोडीत निघणार असून ग्रामसभेत बंदीचा ठराव मंजूर केला जाणार आहे.
प्रसिद्ध वारकरी संत खंडोजीबाबा यांचे लोणी हे जन्मगाव असून पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षी या गावात जानेवारी महिन्यात मोठा सप्ताह आयोजित करण्यात येतो. या सप्ताहाचे काल्याचे कीर्तन मागील १२ वर्षांपासून महंत नामदेवशास्त्री करत आहेत.
ग्रामसभेचा ठराव घेणार
ग्रामस्थांच्या बैठकीत महंत नामदेवशास्त्रींना गावबंदीचा निर्णय झाला आहे. लवकरच ग्रामपंचायतचा व ग्रामसभेचाही ठराव घेणार आहोत. या विषयावर सर्व ग्रामस्थ आमच्यासोबत आहेत, असे भाजप कार्यकर्ते व लोणीचे सरपंच विठ्ठल बडे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...