आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे गोपीनाथ मुंडे यांचे श्रद्धास्थान भगवानगड, जाणून घ्या इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे श्रद्धास्थान म्हणून भगवानगड प्रसिद्ध आहे. प्रत्येक दसऱ्याला ते या ठिकाणी आवर्जून येत असत. परंतु, आता त्यांची मुलगी पंकजा पालवे-मुंडे हिने या ठिकाणी दसऱ्याला प्रचंड सभा घेऊन प्रत्येक वर्षी येण्याचे आश्वासन दिले आहे. विशेष म्हणजे या सभेला भाजपचे अध्यक्ष अमित शहा हेही उपस्थित होते. या सभेत शहा यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व पंकजा यांना देण्याचे संकेत दिले आहेत. तर जाणून घेऊयात महाराष्ट्राचे श्रद्धास्थान भगवानगडाबद्दल...
श्रीक्षेत्र "भगवानगड" बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानजवळूनच राष्ट्रीय महामार्ग जातो. राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषींचे मंदिर आहे. जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.
असा आहे इतिहास....
या ठिकाणाच्या इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते, की सप्तर्षींनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण 'धौम्यगड' किंवा 'धुम्यागड' म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण आहे. सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे.
काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरु होतो.
पुढील स्लाईडवर छायाचित्रांच्या माध्यमातून घ्या भगवान गडाचे दर्शन...