आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीभाकर यात्रेला जनसागर लोटला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - हदगाव तालुक्यातील तामसा येथे दरवर्षी मकर संक्रांतीच्या दुस-या दिवशी भरणारी भाजीभाकर यात्रा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक समजली जाते. या वर्षी या यात्रेला 40 हजारांहून अधिक यात्रेकरूंनी हजेरी लावली.
तामसा येथील बारा ज्योतिर्लिंग देवस्थान हे अत्यंत पुरातन मंदिर आहे. हेमाडपंती मंदिरात असलेले बारा ज्योतिर्लिंग हे पंचक्रोशीतील हजारो लोकांचे श्रद्धास्थान आहे. रेवणअप्पा महादलिंगअप्पा कंठाळे या मंदिरात मुख्य पुजारी आहेत. या यात्रेत प्रत्येक यात्रेकरूला प्रसादरूपाने भाजीभाकर दिली जाते. ही परंपरा जवळपास दीडशे वर्षांपासून सुरू आहे. बाजारात मिळणा-या सर्व भाज्या तसेच शेतात मिळणा-या विविध पालेभाज्या एकत्रित करून भाजी केली जाते.
यावर्षी जवळपास 90 क्विंटलची भाजी आणि 400 क्विंटल ज्वारीच्या पीठाच्या भाकरी करण्यात आल्या. दुपारी मंदिरात महापूजा झाल्यानंतर या प्रसादाचे वितरण सुरू होते. त्यानंतर प्रसाद वितरणाचा हा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. तामसा येथील व्यापारी वर्ग, शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे दान करून या महाकाल्याला मदत देतात.