आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करंजखेडा येथे पावणेबारा लाखांचा अपहार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिशोर - कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथील भारत निर्माण योजनेत 11 लाख 82 हजार रुपयांचा कोणताही कार्यालयीन हिशेब न ठेवता अपहार केला, अशी फिर्याद शंकर निकम (रा. करंजखेडा) यांनी दिली आहे. याप्रकरणी पाणीपुरवठा समिती अध्यक्ष (तत्कालीन), उपाध्यक्ष, सचिव व पाणीपुरवठा समितीच्या इतर पदाधिकार्‍यांवर पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

करंजखेडा येथील भारत निर्माण योजनेअंतर्गत काम मंजूर झाले होते. त्यासाठी 2007 ते 09 मध्ये पाणीपुरवठा समिती अध्यक्ष अवचित तुळशीराम वळवळे, उपाध्यक्षा अर्चना भगवान कोल्हे, सचिव विनायक वामन काळे आणि पाणीपुरवठा समितीच्या इतर सदस्यांनी संगनमत करून मंजूर झालेल्या निधीतून 74 लाख 98 हजार 300 रुपयांमधून 53 लाख 20 हजार 605 रुपये उचल घेऊन प्रत्यक्ष कामावर मोजमाप पुस्तिकेनुसार 41 लाख 38 हजार 514 रुपये खर्च केले. या योजनेत कामकाज पूर्ण न करता अर्धवट स्थितीत सोडून उर्वरित रक्कम 11 लाख 82 हजार 91 रुपयांचा कोणत्याही प्रकारे कार्यालयीन हिशेब न ठेवता रकमेचा अपहार केला, अशी फिर्याद शंकर निकम यांनी दिली.