आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीमा-चंद्रभागेने घेतली भोगावतीची गळाभेट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - उजनी पाणीपुरवठा योजनेची मंगळवारपासून सुरू झालेली चाचणी विनाअडथळा यशस्वी झाली असून गुरुवारी पहाटे 5.30 वाजता शहरातील जिजाऊ चौकापर्यंत पाणी दाखल झाले. त्यानंतर सकाळी 10 वाजता भोगावती नदीच्या पात्रात सोडण्यात आले. पश्चिम महाराष्‍ट्रातील भीमा-चंद्रभागा नदीने मराठवाड्यातून उगम पावणाºया भोगावती नदीची गळाभेट घेतल्याचा आनंद नागरिकांमध्ये दिसत होता.


महिलांनी व्हॉल्व्हचे पूजन करून, तर तरुणांनी फटाक्यांची आतषबाजी करून पाण्याचे स्वागत केले. तत्पूर्वी पहाटे 5.30 वाजता शहरातील जिजाऊ चौकानजीक व्हॉल्व्हपर्यंत पाणी आल्यानंतर चाचणीमधला खरा अडसर दूर झाला.


टेकड्यांचा अडसर संपला
उस्मानाबाद शहरात म्हणजे समुद्रसपाटीपासून सुमारे 1 हजार फूट उंचीवर पाणी आणण्याचे आव्हान ठेकेदाराने पेलले. शहरानजीक हातलादेवी पायथ्यापर्यंत पाणी आल्यानंतर मागच्या भागात गळती सुरू झाल्यामुळे उर्वरित टेकड्या पार करून पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत दाखल होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण निर्माण झाले होते.


आठवड्यात पोहोचेल घराघरात पाणी
शहराच्या निम्म्या भागात पाणी दाखल झाल्यानंतर मागच्या भागात गळती लागली. या गळतीच्या दुरुस्तीसाठी पंप बंद करण्यात आले आहेत. गुरुवारी व शुक्रवारी गळतीची दुरुस्ती करून पुन्हा पंप सुरू करण्यात येणार आहेत. या दुरुस्तीनंतर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी चार दिवसांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उजनीचे पाणी प्रत्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.


असे आले पाणी
खानापूर : बुधवार सायंकाळी 5 वाजता
हातलादेवी : बुधवार रात्री 12 वा.
जाधववाडी रस्ता : बुधवार मध्यरात्र 1 वा.
जिजाऊ चौक : गुरुवार पहाटे 5.30 वा.
भोगावती नदी : गुरुवार सकाळी 10 वा.