आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जि.प.मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या काठावर, भाजपकडे 19 संख्याबळ (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड-  जिल्ह्यात ६० गटांत राष्ट्रवादीने २५ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या तीन सदस्यांसह दोन अपक्षांसह  अन्य एक सदस्याने  मदत केली तर राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित होईल. भाजपकडे मात्र केवळ १९ हे  संख्याबळ आहे.
 
भाजपबरोबर राष्ट्रवादी वगळता इतर सर्व पक्ष एकत्र  आले तर भाजपची सत्ता येऊ शकते.  
पाच वर्षांपूर्वी बीड जिल्हा परिषदेत  भाजप-शिवसेना युती व काँग्रेस, राष्ट्रवादीचे प्रत्येकी २९ असे समान संख्याबळ असल्याने सोडततीने राष्ट्रवादीचे नशीब फळफळले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढले.
 
अपवाद होता फक्त परळीचा कारण परळीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाली होती.  या निवडणुकीत आमदार विनायक मेटे यांची भारतीय संग्राम परिषद, राष्ट्रवादीचे बंडखोर सभापती  संदीप क्षीरसागर यांची काकू-नाना विकास आघाडी पहिल्यांदाच उतरली. मतमोजणीत धक्कादायक निकाल हाती आले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे यांनी प्रचार करूनही भाजपला १९ जागा मिळाल्या. पाच जागा भाजपच्या घटल्या. पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यात विरोधी पक्षनेते मुंडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे, संजय दौंड, माकपचे पी.एस.घाडगे यांनी एकत्र येत आघाडी करून भाजपचा सफाया केला.
 
भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पाेकळे यांच्या पत्नी सारिका पोकळे यांचा नेकनूरमधून तर भाजप आमदार आर.टी.देशमुख यांचे पुत्र रोहित देशमुख हे पात्रूड गटातून,  जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चना रमेश आडसकर युसूफ वडगाव गटातून तर पुतण्या ऋषीकेश आडसकर यांचा  चिंचोलीमाळी गटातून पराभव झाला. 

अपक्ष भाव खाणार   
पिंपळनेर गटातून गोपीनाथ मुंडे परिवर्तन आघाडीच्या अपक्ष उमेदवार सविता रामदास बडे यांनी भाजपचे विद्यमान सदस्य दशरथ वनवे यांची सून अंजना वनवे यांचा पराभव केला, तर हरिनारायण आष्टा गटातून अश्विनी अमर निंबाळकर या अपक्ष विजयी झाल्याने त्यांचा भाव वधारला.
बातम्या आणखी आहेत...