आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकर बलात्कार प्रकरण; मुख्य आरोपीस अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - भोकर येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस सुनील सांभाळकर व अन्य एकास पोलिसांनी सोमवारी दुपारी भोकर येथील म्हैसा रोडवर अटक केली.
भोकर येथे 4 फेबु्रवारी रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी खडकी (ता.हिमायतनगर) येथील 14 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलिस सुनील सांभाळकर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांपैकी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नांदेडच्या पथकाने सोमवारी भोकर-म्हैसा रस्त्यावरील टी पॉइंटवर त्यास पकडून भोकर पोलिसांच्या स्वाधीन केले. तसेच याच गुन्ह्यातील आरोपी माजिद खान राजे खान यास मदत करून शनिमंदिर परिसरातील शेत व झोपडी उपलब्ध करून देणारा सहआरोपी महादू देवकर (रा. भोकर) यास पोलिसांनी सोमवारी सकाळी 9 वाजता त्याच्या घरातून अटक केली. आतापर्यंत या गुन्ह्यात नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत सोळंके यांनी दिली.