आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोकरदनला गणेशमहासंघातर्फे कुस्‍त्यांचा आखाडा, 200 पहिलवान सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन/औरंगाबाद- भोकरदन येथे गणेश महासंघाच्या वतीने नगरपरिषद कार्यालयाच्‍या पाठीमागील मैदानावर कुस्‍त्यांचा आखाडा भरवण्यात आला आहे. भोकरदनचे उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांच्या हस्ते आखाड्याला करण्यात आली. आखाड्यात भोकरदन जाफ्राबाद सिल्लोड तालुक्यातील, बुलढाणा, जालना औरंगाबाद येथून आलेले 200 पहिलवान सहभागी झाले, खास तयार केलेल्या मैदानात एकाच वेळी 5 ते 7 कुस्‍त्यांच्या लढती सुरु करण्यात आल्या.
- महासंघाचे अध्यक्ष मुकेश चिने, सतिष रोकडे, राहुल ठाकूर, नारायण जीवरखं, अंकुश बडख बाबर आली, इरफान सिद्दीकी, सूर्यकांत पाटील यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्‍थिती होती.
- कुस्‍त्यांचा आखाडा पाहण्‍यासाठी बघ्‍यांची येथे गर्दी होत आहे.
- विजयी पहिलवानांना 500 ते 5ooo हजार रुपयांपर्यंत बक्षीसे देण्‍यात आली.
- भोकरदन गणेशमहासंघाच्या वतीने आखाड्यात 2 लाख रुपयांची बक्षिसे देण्‍यात आली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, आखाड्यातील फोटो..
छाया- महेश देशपांडे
बातम्या आणखी आहेत...