आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तो' खूनच; आरोपीला सात दिवसांची कोठडी, बिडकीन पोलिसांना यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिडकीन - बेपत्ता ट्रॅक्टर मेकॅनिकचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. त्याचा खून झाल्याचा संशय असून पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवून संशयिताला अटक केली. संशयितास ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शेख अलीम शेख जनेखाँ पठाण (२८, लाखेगाव, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे.
शेख गणी शेख बाबू (३५, रा. काजळा, ह.मु. सादातनगर) हा २८ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाल्याची नोंद पत्नीने बिडकीन पाेलिसात केली होती. त्याचा मृतदेह शनिवारी बिडकीनच्या माळरानावर असलेल्या एका विहिरीत आढळून आला. मृतदेहावर पालापाचोळा टाकून तो झाकण्याचा प्रयत्न व जखमा यावरून गणीचा खूनच झाल्याची खात्री पटली.
चौकशीअंती दिली कबुली
माझे गणीच्या घरी येणे-जाणे होते. गणीने दोन महिन्यांपूर्वी मला घरी येण्यास मज्जाव केला. त्यामुळे मी २८ ऑक्टोबर रोजी गणीला माळरानावरील विहिरीजवळ घेऊन गेलो व त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यास विहिरीत ढकलून दिले, अशी कबुली दिली.