आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात बिंदूसरा प्रकल्प ओव्हर फ्लो; धरणाच्या भिंतीवरून वाहु लागले पाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- तालुक्यातील पाली जवळील बिंदुसरा मध्यम प्रकल्प मंगळवारी सायंकाळी शंभर टक्के भरला असुन प्रकल्पाच्या मोठ्या भिंतीवरून पाणी पडू लागल्याने हा नजराना पाहण्यासाठी  परिसरातील नागरिक गर्दी करू लागले आहेत. बिंदूसरा नदीच्या पात्रात सध्या वेगाने पाणी वाहत आहे.

आठ दिवसापूर्वी पाटोदा व बीड तालुक्यातील भायाळासह बीड तालुक्यातील पोखरी, बांगरवाडा, बेलखंडी पाटोदा, नागझरी, कदमवाडी या परिसरात पाऊस झाल्याने  बिंदुसरा  प्रकल्पावरील डोकेवाडा साठवण तलाव ओसंडून वाहत असुन या तलावाचे पाणी थेट बिंदूसरा नदीतुन प्रकल्पात येत असल्याने मंगळवारी सायंकाळी बिंदूसरा प्रकल्पही शंभर टक्के भरले  आहे. प्रकल्पाचे  पाणी मोठ्या चादरीवरून वाहु लागले आहे. या धरणाची क्षमता ७.९० दलघमी आहे. दुसरीकडे नेकनूर, गवारी, रत्नागिरी, कपीलधार परिसरातील पावसामुळे कर्झणी येथील तलाव भरला असुन खटकाळी बंधाऱ्यातुन वाहणारे पाणी बिंदूसरा नदीपात्रात जावुन मिळत असल्याने सध्या बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे.मोठा पाऊस येताच बिंदूसरा नदीवरील शहरातील  चांदणी चौकातील दगड पुल पाण्याखाली जात असुन संपर्क तुटत आहे. येत्या काही दिवसात मोठे पाऊस झाल्यास बीडमध्ये महापुराचा धोका निर्माण होऊ शकतो.

बिंदूसरेचा उगम पाटोद्यात   
बिंदुसरा नदीचा उगम पाटोदा तालुक्यातील बेनसुर येथील डोंगराळ भागात होतो. ही सिधंफणाची एक उपनदी आहे. बिंदुसरा नदीवर  पाली जवळ मध्यम प्रकल्प असुन बिंदुसरा नदी बीड शहरातून वाहत जाऊन पुढे सिंधफणेस मिळते. पुढे सिंदफणा गोदावरीला नदीला मिळते.बीड जिल्ह्याचा पाण्याचा मुख्य स्त्रोत हा गोदावरी नदीचा असुन  याच नदीने जिल्ह्याची उत्तर सीमा निश्चित केली आहे. गोदावरी बरोबरच सिदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, वाण या गोदावरीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात. जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून मांजरा ही दुसरी महत्त्वाची नदी वाहते. चौसाळा, केज, रेना व लिंबा या मांजरा नदीच्या उपनद्या जिल्ह्यातून वाहतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हिडिओ..मोठ्या चादरीवरून पाणी पडू लागल्याने हा नजराना पाहण्यासाठी नागरिकांनी केली गर्दी...
बातम्या आणखी आहेत...