आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूर मंदिरात अाता बायोमेट्रिक ओळखपत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- तुळभवानी मंदिरात रविवारपासून भाविकांना बायोमेट्रिक ओळखपत्र (अॅक्सेस कार्ड) सक्तीचे करण्यात आले असून ओळखपत्र घेऊनच प्रत्येकाला प्रवेश देण्यात येत आहे. हे ओळखपत्र भक्त निवासातून मोफत मिळेल. यासाठी लागणारे मनुष्यबळ, २४ मशीन व इतर साहित्य केंद्राच्या वतीने पुरवण्यात आले आहे, असे व्यवस्थापक व तहसीलदार सुनील पवार यांनी सांगितले.

अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे रविवारी भक्तांसह पुजारी वर्गात गोंधळ उडाला. मंदिरात सकाळी भाविकांसह पुजाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी महाद्वारातच अडवून ओळखपत्राची मागणी केली. 
बातम्या आणखी आहेत...