आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विश्लेषण : लोह्याच्या मेळाव्यानिमित्ताने शिवसेना-भाजप युतीतील वास्तव आले समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड -हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भारतीय जनता पक्षाची युती गेल्या २५ वर्षांपासून टिकून असली तरी हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून अंतर ठेवून राहतात. त्यांच्यात अजूनही पूर्ण घरोबा झालेला नाही हे लोहा येथील मेळाव्यावरून स्पष्ट झाले. लोहा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला भाजपचा एकही नेता उपस्थित नव्हता.
माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी लोहा येथे शनिवारी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा आयोजित केला. शिवसेनेचे नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद येथील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित होते, परंतु या मेळाव्याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मात्र पाठ फिरविली. महायुतीतील इतर घटक पक्षांचे नेतेही या मेळाव्याकडे फिरकले नाहीत.
सभेला जायला हरकत नव्हती
पंकजा मुंडे यांची संघर्ष यात्रा आली तेव्हा शिवसेनेचे प्रा. मनोहर धोंडे कंधारच्या जाहीर सभेला उपस्थित होते. इतर कोणी नव्हते. लोहा येथील मेळावा शिवसेनेचा होता. त्यामुळे भाजपचे नेते कोणी गेले नसावेत. मी मुंबईत असल्याने मला त्याबाबत मािहती नाही, परंतु महायुतीत असल्याने गेले तर काही हरकत नव्हती. मी असतो तर गेलो असतो.
राम रातोळीकर, जिल्हाध्यक्ष भाजप

प्रा. मनोहर धोंडेही गैरहजर
शिवसेनेच्या मेळाव्याला प्रा. मनोहर धोंडे लोह्यात असूनही मेळाव्याकडे फिरकले नाहीत. प्रताप पाटील चिखलीकरांना शिवसेनेत घेण्यास त्यांचा विरोध होता. उद्धव ठाकरेंच्या मार्गावर असलेल्या कार्यालयासमोर त्यांनी कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या स्वागताची तयारी केली. तथापि, उद्धव ठाकरे तिथे थांबले नाहीत.