आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमध्ये लवकरच होणार फेरबदल, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- भारतीय जनता पक्षात लवकरच मोठे फेरबदल करण्यात येणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले. त्याचबरोबर पक्षसंघटनेत जुन्या व नव्या सर्वच कार्यकर्त्यांना सामावून घेणार असल्याची पुष्टीही या वेळी प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी जोडली. ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक पुरवठा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी (दि. ३०) पत्नीसह तुळजापुरात येऊन तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
या वेळी पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष दानवे म्हणाले की, भारतीय जनता पक्षात एक व्यक्ती एक पद ही संकल्पना मानली जाते. त्यानुसार योग्य वेळी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला जाईल, असेही दानवे यांनी या वेळी स्पष्ट केले. तत्पूर्वी दानवे यांनी पत्नीसह तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन देवीची खणा-नारळाने ओटी भरून पूजा केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी मंदिरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती दानवे यांना दिली. तसेच मंदिर संस्थान कार्यालयात देवस्थानच्या वतीने दानवे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी त्यांच्यासमवेत खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, अॅड. मिलिंद पाटील, संजय निंबाळकर आदींची उपस्थिती होती.