आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप इच्छुकांच्या मुलाखती; परतूरमधून चौघे इच्छुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील इच्छुकांच्या सोमवारी मुलाखती घेण्यात आल्या. जिल्ह्याचे निरीक्षक आमदार डॉ.रंजित पाटील आणि जमाल सिद्दिकी यांनी या मुलाखती घेतल्या. मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक चार उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
शहरातील संभाजीनगर येथे असलेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयात या मुलाखती घेण्यात आल्या.
याप्रसंगी इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनही केले. यात भाजपकडे असलेल्या मंठा-परतूर आणि भोकरदन-जाफराबाद या दोन मतदारसंघाशिवाय जालना,बदनापूर आणि घनसावंगी मतदारसंघातील इच्छुकांची मते निरीक्षकांनी जाणून घेतली. परतूरमधून बबनराव लोणीकर,बळीराम कडपे, बाबासाहेब तेलगड,सुभाष राठोड यांनी मुलाखत दिली. भोकरदन मतदारसंघातून संतोष दानवे, रमेश गव्हाड,शेषराव कळंबे, शिवाजी थोटे यांनी मुलाखत दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुलाखतीनंतर निरीक्षक तथा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ.रंजित पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष माजी आमदार बबनराव लोणीकर, शिवाजीराव थोटे, संतोष दानवे, राहुल लोणीकर, देवीदास देशमुख,रामेश्वर भांदरगे, सतिष जाधव, दीपक ठाकूर आदींची उपस्थिती होती. दरम्यान कोणत्या प्रत्येक मतदारसंघातून किती आणि कोणत्या उमेदवारांनी मुलाखती दिल्या याबाबतची अधिकृत निरीक्षक आणि भाजपच्या पदाधिका-यांनीही दिली नाही.

फोटो - जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हा निरीक्षक आमदार डॉ. रंजित पाटील आणि जमाल सिद्दिकी यांनी मुलाखती घेतल्या. याप्रसंगी रामेश्वरचे चेअरमन संतोष दानवे यांनी निरीक्षकांशी चर्चा केली. छाया । नागेश बेनीवाल