आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडे इच्छुकांची गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या यशानंतर कधी नव्हे ते भाजपकडे विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. त्यातच तुळजापूर नगरपालिकेत राष्ट्रवादीचे सर्व 19 नगरसेवक निवडून आणत एकछत्री सत्ता काबीज करणार्‍या राष्ट्रवादीच्या पिंटू गंगणे यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केल्याने राजकीय वतरुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गंगणे यांच्या उमेदवारीच्या मागणीमागे 19 पैकी 15 नगरसेवक असल्याचे खात्रीशीर वृत्त असून यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीला जबर हादरा बसणार असल्याचे चित्र दिसत आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, भाजप, रिपाइं, स्वाभिमानी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष अशी महायुती असली, तरी लोकसभेच्या यशानंतर भाजपने राज्यभरातील 288 मतदारसंघांत उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या भेटीगाठी आणि मुलाखती रविवारी (दि.3) शासकीय विर्शामगृहात पार पडल्या. तत्पूर्वी व्यंकटेश महाजन महाविद्यालयात इच्छुकांच्या शिष्टमंडळाच्याही निरीक्षक म्हणून आलेल्या भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा नीताताई वाघ व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.

जालन्यात इच्छुकांच्या आज मुलाखती
सोमवारी भाजपच्या वतीने जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पक्षाचे जिल्हा निरीक्षक डॉ. रंजित पाटील आणि जमाल सिद्दिकी या मुलाखती घेणार आहेत. भाजपच्या जालना शहरातील जिल्हा कार्यालयात सकाळी 11 वा. मुलाखतींना सुरुवात होणार आहे. पाचही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

(फोटो : नांदेडमध्येही इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती. नायगाव मतदारसंघातून इच्छुक उमेदवार र्शावण भिलवंडे यांनी नांदेडमध्ये शक्तिप्रदर्शन केले. सुमारे 200 गाड्यांचा ताफा त्यांनी जमवला होता. छाया : नरेंद्र गडप्पा, नांदेड)