आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रातील भाजप सरकारचे धोरण शेतकरी विरोधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड : केंद्रातील भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने उभे न राहता शेतकरीविरोधी धोरण राबवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेला सरकारचे धोरण कारणीभूत आहे, असा आरोप माजी खासदार तथा किसान समन्वय समितीचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग मान यांनी यांनी केला.
नांदेड येथे आयोजित शेतकरी संघटनेच्या तेराव्या तीनदिवसीय अधिवेशनाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
या वेळी मंचावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, अधिवेशनाचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, निमंत्रक म्हणून माजी आमदार वामनराव चटप, रवी काशीकर, डॉ. मानवेंद्र काचोळे, गोविंद जोशी, अमर हबीब, शैला देशपांडे, सरोज काशीकर, संजय कोल्हे, दिनेश शर्मा, शिवाजी शिंदे, सुधीर बिंदू, विठ्ठल जाधव, अॅड. धोंडिबा पवार, संभाजी चव्हाण, जमनाबाई ढगे आदींची उपस्थिती होती.
अधिवेशनाच्या पूर्वी शेतकरी संघटनेच्या झेंड्याचे मान्यवरांच्या हस्ते आरोहण करून अधिवेशनाला सुरुवात झाली. भूपेंद्रसिंग मान म्हणाले, की आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत. मात्र प्रत्येक पक्षाने धोरण राबवताना शेतकरी व शेतीचा विचार मांडला.
पण जे सरकार सत्तेवर आले, त्यांनी शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार केला नाही. त्या पक्षाचे शेतीविषयक धोरण हे मनापासून राहण्यापेक्षा वरवरचा ढोंग आहे. अध्यक्षीय भाषणात रामचंद्र पाटील म्हणाले की शरद जोशी यांच्या निधनानंतर शेतकरी संघटना संपली, असा अनेकांनी अंदाज बांधला; पण तो खोटा ठरला.
बातम्या आणखी आहेत...