आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटातटाचे राजकारण, भाजपलाही बंडखोरीची लागण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - औरंगाबाद तालुक्यात जुलै महिन्यात होत असलेल्या खरेदी-विक्री संघ कृषी उत्पन्न बाजार समिती या सहकारी संस्थांच्या निवडणुका अत्यंत चुरशीने होणार हे आता स्पष्ट झाले आहे. कारण काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाले असून भाजपलाही बंडखोरीची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या औरंगाबाद तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १२ जुलै रोजी होत आहे. या संस्थेत १८ जागांसाठी एकूण १९९ उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले होते. त्यापैकी गुरुवारी (२५ जून) ११८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले. आता रिंगणात प्रत्यक्षात ८१ उमेदवार राहिले आहेत. माजी आमदार डॉ. कल्याणराव काळे जिल्हा सेवा दल अध्यक्ष विलास बापू औताडे यांच्यात दोन वेगवेगळे गट पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसतर्फे दोन पॅनल निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काँग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण सुरू झाल्याने मतदार संभ्रमात पडले आहेत.

औरंगाबाद तालुका शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघाच्या १५ जागांसाठी जुलै रोजी मतदान होत आहे. अनुसूचित जाती जमाती राखीव मतदारसंघातून काँग्रेसचे अण्णासाहेब मुदगल हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता १४ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या संघात एकूण ५८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. बुधवारी २५ उमेदवारांनी आपले नामांकन मागे घेतले आहे. डबघाईला आलेल्या या खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीसाठी कुठल्याही राजकीय पक्षात बंडखोरी झाली नाही.

या संस्थेत भाजप-सेना एकत्र लढत असून त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने संयुक्त पॅनल उभे करून दंड थाेपटले आहेत. या संस्थेसाठी जुलैला सकाळी ते वाजेदरम्यान मतदान होत आहे. मतदान संपल्यानंतर याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय
भाजपशिवसेनेमध्ये अखेरपर्यंत युतीसाठी प्रयत्न झाले, परंतु युती करण्यास वरिष्ठांना यश आले नाही. शेवटी भाजप शिवसेनेने आपापले स्वतंत्र पॅनल उभे केले आहेत. भाजपमध्येही चार वरिष्ठ उमेदवारांनी आपली उमेदवारी परत घेतली नाही. त्यामुळे भाजपलाही बंडखोरीची लागण झाली आहे. भाजपने आपल्या सर्व नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे. भाजप बंडखोरांनी वैयक्तिकरीत्या स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकारी संस्थेचे ९२९, ग्रामपंचायत ९७७, व्यापारी १३००, तर हमाल मापाडी मतदारसंघात ४५० मतदार आहेत.
बातम्या आणखी आहेत...