आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप इच्छूकांच्या आज मुलाखती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी भाजपाच्या वतीने जिल्ह्यातील इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. पक्षाचे जिल्हा निरीक्षक डॉ. रंजीत पाटील आणि जमाल सिध्दीकी या मुलाखती घेणार आहेत.
भाजपच्या जालना शहरातील जिल्हा कार्यालयात सकाळी 11 वाजेपासुन या मुलाखतींना सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे पाचही विधानसभा मतदारसंघातील इच्छूकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार बबनराव लोणीकर, किशोर अग्रवाल यांच्यासह जिल्हा कोअर कमेटी सदस्य देवीदास देशमुख, शिवाजीराव थोटे, अनिल कोलते, रामेश्वर भांदरगे, बाबुराव खरात, सतिष जाधव आदींची उपस्थिती असणार आहे. यावेळी जिल्हा कार्यकारिणी पदाधीकारी, तालुका कार्यकारीणी पदाधिकारी, जिल्हा परिषद, नगरपरिषद,पंचायत समिती सदस्यांनी उपस्थिती रहावे असे अवाहन भाजपचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख बाबासाहेब कोलते यांनी केले आहे.