आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Gopinath Munde Comment CM Of Maharashtra

मोदी पंतप्रधानपदी, तर मी मुख्यमंत्री; गोपीनाथ मुंडे यांचा दावा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने शेतकर्‍यांसह जनतेचे रक्त शोषले. त्यांचा जीव वेशीला टांगण्याची कटकारस्थाने केली. आता परिवर्तनाची वेळ आली असून युवाशक्ती नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी आणि मला राज्याच्या मुख्यमंत्रिपदी बसवेल, असा दावा खासदार गोपीनाथ मुंडे यांनी येथे जाहीर सभेत केला. पाशा पटेल यांनी शेतकर्‍यांच्या मालाला भाव मिळावा, यासाठी काढलेल्या ‘लातूर ते औरंगाबाद’ दिंडीचे रविवारी बीड शहरात आगमन झाल्यावर जाहीर सभेत ते बोलत होते. मुंडे म्हणाले, पंतप्रधानपदी मोदी विराजमान होणार या कल्पनेमुळे विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे. शरद पवारांचे तर गुडघ्याला बाशिंग आहे. त्यांनी कोणावरही टीका करू नये.