आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी प्रभावामुळे काँग्रेसला 1977 प्रमाणेच धोबीपछाड; मुंडेचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना सर्वच क्षेत्रांतून समर्थन वाढत आहे. सन 1977 मध्ये आठ राज्यांमधून काँग्रेस हटली, त्याच पद्धतीने चार राज्यांतील आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत एनडीएला पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा भाजपचे लोकसभेतील उपनेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केला. दिवाळीनिमित्त परळीत आलेल्या खासदार मुंडे यांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीशी खास बातचीत केली.
ते म्हणाले, 15 वर्षांमध्ये गुजरातचा सर्वांगीण विकास केल्यामुळे मोदी यांची वेगळी छबी निर्माण झाली आहे. पारंपरिक राजकारणात न गुंतणाºया आणि राज्य प्रत्येक क्षेत्रात पुढेच राहील याची सतत काळजी घेणाºया मोदींना मतदारांनी सलग तिसºयांदा मुख्यमंत्रिपदी बसवले. त्यामुळे मोदी यांच्याकडे पूर्ण देश पंतप्रधान म्हणूनच बघत आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी आतापर्यंत कधीच राजकीय भाष्य केलं नाही. मात्र, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. देशात 1977 मध्ये आणीबाणी होती. त्या काळात इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पायउतार व्हावे लागले. तसेच आठ राज्यांमधील काँग्रेसची सत्ता संपुष्टात आली होती. आज तीच स्थिती आहे. नागरिकांना प्रामाणिक आणि स्वच्छ सरकार हवे आहे. देशात परिवर्तनाची लाट आहे. लोकांना चेहरा हवा होता, तो मोदींच्या रूपाने मिळाला आहे. त्यांच्यासारखा सामर्थ्यवान नेता नाही. लोकसभेत सध्या भाजपचे 119, शिवसेनेचे 11, अकाली दलाचे चार खासदार आहेत. बहुमतासाठी आणखी साठचा आकडा मोदींच्या नेतृत्वाखाली सहज पार होऊन एनडीए बहुमताच्या बळावर केंद्रात सत्ता मिळवेल, असा दावा त्यांनी केला.

आघाडी सरकारचा कडेलोट करणार
आपण लोकसभा निवडणूकच लढवणार असून मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये आपल्याला संधी आहे, याचा पुनरुच्चर करत ते म्हणाले, बिहारमध्ये जेडीयूसोबत नसले तरी तेथील वातावरण भाजपला पोषक आहे. बिहारसह देशातील चारही राज्यांमध्ये भाजपचे सरकार येईल. महाराष्ट्रात 1995 पेक्षाही वाईट स्थिती आहे. पवारांच्या नेतृत्वाखालील सरकारपेक्षाही हे सरकार भ्रष्ट व बेमुर्वतखोर आहे. दहा वर्षे सत्ता भोगूनही या सरकारला काडीचाही विकास साध्य झाला नाही. पूर्ण कार्यकाळात भ्रष्टाचाराचा कळस चढवणारे हे सरकार हद्दपार करण्यासाठी लढा देणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

दिवाळीनंतर जनआंदोलन
वीज कंपनीने राज्यभरातील नागरिकांवर दरवाढ लादली आहे. औद्योगिक क्षेत्राला तिप्पट, शेतकºयांना दुप्पट, तर घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलापोटी 45 टक्के जास्त रक्कम भरावी लागणार आहे. महागाईने पिचलेल्या नागरिकांवर अशी दरवाढ लादणे अन्याय्य आहे. ही वाढ मागे घ्यावी. वीजपुरवठ्याअभावी अनेक नळयोजनाही बंद आहेत. आदिवासी भागात पूर्ण अंधार आहे. याविरुद्ध दिवाळीनंतर तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचेही ते म्हणाले.