आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bjp Leader Gopinath Munde Comment On MLA Issue At Mumbai

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्यायाविरुद्ध आमदारांनी एकत्र येण्याची गरज : मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- अर्थसंकल्पातील 25 टक्के पैसा दुष्काळ निवारणावर खर्च करण्यात येणार आहे. मात्र रकमेची विभागणी, नियोजनच नाही. त्यापैकी 1250 कोटी रुपये कृष्णा खोर्‍यासाठी खर्च होणार आहेत. प. महाराष्ट्रात पैसा वळवण्याचा हा प्रकार आहे. अन्यायाविरुद्ध मराठवाड्यातील आमदारांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले. देवगिरी बँकेच्या जालना शाखेच्या स्थलांतर सोहळ्यात ते बोलत होते.

गतवर्षी चारा छावण्यांवर 750 कोटी रुपये खर्च झाले. मराठवाड्याला 10 कोटी मिळाले. पिण्याच्या पाण्याचे 450 कोटीपैकी 50 कोटी वाट्याला आले. दुष्काळामुळे विभागातून 5 हजार लोकांनी स्थलांतर केले आहे. मुंबईतील मेळाव्यात अंबड तालुक्यातील 400 कुटुंबे होती, असे ते म्हणाले. अभिनेता संजय दत्तला माफी देण्याची सध्या सुरू असलेली चर्चा अयोग्य आहे. त्याने केलेली चूक लहान नाही, असे मुंडे म्हणाले.