आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीची अधोगती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली केंद्रात एकहाती सत्ता मिळवण्याची किमया भाजपने घडवली. मात्र, वैजापूर तालुका पातळीवर भाजपची संघटनात्मक व राजकीय सत्तापटावर कायम असलेली अधोगती सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपला उभारीचे अच्छे दिन केव्हा येतील, याकडे राजकीय वर्तुळातील मंडळीचे लक्ष लागले आहे.

वैजापूर तालुक्यात शिवसेना- भाजप पक्षाची पंधरा वर्षांपासून युती आहे. शिवसेनेचे आर. एम. वाणी हे सलग तिस-यांदा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करत आहेत. 1998 ला आर. एम. वाणी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी गाव तिथे शाखा ही संकल्पना प्रभावीपणे राबवल्यामुळे 1999 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीची आमदारकी वाणी यांना बहुमताने प्राप्त झाली. एकीकडे शिवसेना या मित्रपक्षाने संघटनात्मक व विविध राजकीय सत्ताकेंदे्र आपल्या प्रभावाखाली आणण्याचा धडाका लावला असताना भाजपला मात्र, मागील पंधरा वर्षांपासून अधोगती प्राप्त झाल्याचे दिसते.
नेतृत्व घडवणारी शाळा
तालुक्याच्या राजकारणात नव्याने उतरलेल्या डॉ. दिनेश परदेशी यांनी भाजपतून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर राजेंद्र साळुंके, विजय व्यवहारे, शिवलिंग साखरे असे अनेक पदाधिकारी भाजपच्या राजकारणाचेच धडे गिरवून तयार झाले व नंतर त्यांनी आपले बस्तान दुस-या पक्षात मांडले.

भाजपला संधी होती
आमदार आर. एम. वाणी यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याअगोदर त्यांची भाजपत येण्याची मोठी इच्छा होती. मात्र, त्यांच्या इच्छेला येथील भाजपमधील एका जोडीने आपला पक्षातील प्रभाव कमी होईल या धास्तीने विरोध केला. त्यामुळे वाणी यांनी भाजपचा नाद सोडत सेनेशी घरोबा केला.

अधोगती कंधी संपणार
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्षपद येथील एकनाथराव जाधव यांच्याकडे आहे. किमान आता तरी त्यांना केंद्राप्रमाणे तालुक्यात भाजपच्या सत्ता पदाची गुढी उभी करावी लागणार आहे. त्यासाठी तालुक्यात मोठी जनसंपर्क मोहीम राबवावी, अशी इच्छा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.