आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला नमनालाच खडा, छाननीतच उमेदवार बाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- मोदी लाटेचा फायदा घेत लातूर महानगरपालिकेत खाते उघडू पाहणार्‍या भारतीय जनता पक्षाला नमनालाच खडा लागला. छाननीत भाजप उमेदवार तुषार गायकवाड यांचा अर्ज बाद झाला आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. व्यंकट बेद्रे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्याने महानगरपालिकेच्या प्रभाग 13 (अ) पोटनिवडणुकीत 11 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्जांची बुधवारी छाननी झाली. त्यात भाजपचे तुषार गायकवाड यांनी अपत्य शपथपत्रावर सही न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. अन्य एक अपक्ष उमेदवार राहुल कावळे यांनी अर्ज व्यवस्थित भरला नाही आणि त्यावर सहीही केली नसल्याने तेही बाद झाले. आता 9 उमेदवार मैदानात आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 13 जून आहे. त्यानंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदान 29 जून रोजी, तर निकाल 30 जूनला जाहीर होणार आहे.
काँग्रेसकडून प्रफुल्ल कांबळे, बसपकडून विजय अजनीकर, तर अपक्ष म्हणून अर्चना आल्टे, जितेंद्र कांबळे, बालाजी शिंदे, शिवप्रसाद शंृगारे, नितीश वाघमारे मैदानात आहेत.