आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या मेळाव्यात संगीत खुर्चीचा खेळ; जुने - नवे नेते, पदाधिकाऱ्यांची मंचावर गर्दी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने येथील एका मंगल कार्यालयात बुधवारी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार सुजीत ठाकूर व प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भाजपचे जुने, नवे व अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या नेते पदाधिकाऱ्यांची मंचावर गर्दी झाली होती. त्यामुळे अनेक नेत्यांना मंचावर बसण्याची इच्छा असतानाही त्यांना बसता येत नव्हते.  नेते भाषण करण्यासाठी गेले की, त्यांच्या जागेवर अन्य नेते बसत असल्यामुळे जणू काही संगीत खुर्ची स्पर्धाच असल्याचा भास होत होता.  काही महिला पदाधिकाऱ्यांना तर समोरच्या रांगेतून मागच्या रांगेत जाऊन बसावे लागले. 

मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांचा मंत्री संभाजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत होता. त्यामुळे मंचावर मोठी गर्दी होत होत असल्याने सूत्रसंचालकाचीही धांदल उडत असल्याने ज्यांना पक्षात प्रवेश करायचा आहे त्यांनी लवकर पक्षात यावे व  जावे, अशी घोषणा करावी लागत होती. लवकर जावे म्हणजे मंचावरून खाली जावे, असे त्यांना म्हणायचे होते.  
 
अशोकरावांना अवदसा आठवली
 आमदार   सुजीत ठाकूर या वेळी म्हणाले की, नुकतीच राहुल गांधी यांची नांदेडमध्ये सभा झाली. ही सभा घेण्याची अशोक चव्हाण यांना कशी काय अवदसा आठवली. कारण राहुल गांधी जेथे-जेथे जातात तेथे तेथे काँग्रेसचा पराभव होतो, त्यामुळे येथे सुरुवात चांगली झाली. 

मत विभाजन टाळण्यासाठी भाजपला साथ 
 शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर या वेळी म्हणाले की, अनेकांना प्रश्न पडला आहे की, मी शिवसेनेचा असतानाही भाजपला कशी मदत करतो, याचा खुलासा करताना ते म्हणाले, की मताचे विभाजन होऊन काँग्रेसला याचा लाभ होऊ नये म्हणून मी भाजपला सहकार्य करत आहे.

अहंकार जिरवण्याची वेळ
या वेळी मंत्री संभाजी पाटील यांनी अशोक चव्हाण यांची तुलना रावणाशी केली. ते म्हणाले की, रावणालाही राजसत्तेचा अहंकार झाला होता, त्याप्रमाणे येथील राजघराण्यातील राजांना (चव्हाण) अहंकार झाला आहे.  त्यांचा अहंकार उतरवण्याची ही योग्य वेळ आहे.

मत विभाजन टाळण्यासाठी भाजपला साथ 
शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर या वेळी म्हणाले की, अनेकांना प्रश्न पडला आहे की, मी शिवसेनेचा असतानाही भाजपला कशी मदत करतो, याचा खुलासा करताना ते म्हणाले, की मताचे विभाजन होऊन काँग्रेसला याचा लाभ होऊ नये म्हणून मी भाजपला सहकार्य करत आहे.   
बातम्या आणखी आहेत...