आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समान निधी वाटपावरून भाजप-शिवसेनेची घोषणा बीड जि‍ल्हा परिषदेत घोषणा बाजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - नऊ महिन्यांनंतर मुहूर्त मिळालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला सोमवारी सुरू होण्यापूर्वीच गालबोट लागले. समान निधी वाटपावरून भाजप-शिवसेनेच्या महिला सदस्यांनी सभागृहाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केले. समान वाटपाची मागणी लावून धरत सदस्यांची मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जवळेकर यांनी 15 मिनिटे सभाग्रहासमोरच रोखून धरले. विरोधी सदस्यांचा रुद्रावतार पाहून सत्ताधार्‍यांनी सभा उरकली.

जिल्हा उपाध्यक्षांच्या कक्षात विरोधी व सत्ताधारी सदस्यात सीईओंच्या उपस्थित समान निधीवर तोडगा निघाला. पण तेवढय़ात सभागृहात सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या सदस्यांनी घाईत मंजुरी देत सभा गुंडाळली. सदस्यांच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेत पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता. दर तीन महिन्यांनी होणार्‍या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेला नऊ महिन्यांनंतर सोमवारी मुहूर्त मिळाला होता.

वित्त आयोगाकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या निधीचे गटनिहाय समान स्वरूपात वाटप करण्यात आलेले नाही. अधिनियम 125-1 अ नुसार अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांनी काही मतदारसंघावर अन्याय केला आहे. याची नोंद घेऊन अधिनियमानुसार निधीचे वाटप करावे, अशी तक्रार भाजपचे सदस्य रामराव खेडकर यांनी सीईओंकडे केली.