आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तार-पालोदकरांचे "सिद्धेश्वर'वर वर्चस्व, भाजपचा दणदणीत पराभव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - येथील सिद्धेश्वर सहकारी वस्त्रोद्योग संस्थेच्या निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार-पालोदकर पॅनलचा दणदणीत विजय झाला. त्यामुळे भाजपच्या पॅनलला पुन्हा एकदा पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रचाराच्या काळात अत्यंत चुरशीची वाटणारी निवडणूक निकालानंतर एकतर्फी झाल्याचे स्पष्ट झाले.

सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी दिलीप जैस्वाल यांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यात कै. दादासाहेब पालोदकर सहकार विकास पॅनलने मुर्डेश्वर शेतकरी सहकार विकास पॅनलच्या उमेदवारांचा सरासरी अकराशे मतांनी पराभव केला. त्यामुळे सत्तार-पालोदकरांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. या निवडणुकीत १० हजार ५८० मतदारांपैकी ६ हजार १३९ मतदारांनी मतदान केले होते. यापैकी १ हजार ६७७ मतपत्रिका बाद झाल्या.

इतर मागासवर्गीय विजयी
काशीनाथ पांडव ३५०३. पराभूत : मधुकर विखनकर २३०३. विमुक्त जाती भटक्या जमाती विजयी : प्रभाकर ब्राह्मणे ३४१२, पराभूत : गोविंदराव भोजने २३९०.

सर्वसाधारण मतदारसंघ
नामदेव कदम ३१८०, नामदेव कोलते ३१५८, गणेश दौड ३१५२, प्रभाकर पालोदकर ३२८२, गुलाब मिरगे ३००९, सय्यद युसूफ २९७०, गंगाधर सोनवणे ३०८०.

महिला राखीव विजयी
गयाबाई काकडे ३३७०, सुमनबाई बडे ३२४६. पराभूत : पद्माबाई शिंदे २३२२, रुख्मणबाई साळवे २४०६. अनुसूचित जाती-जमाती : विजयी : राजाराम पाडळे ३५००, पराभूत : अण्णासाहेब शिरसाठ २३१६.
बातम्या आणखी आहेत...