आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या महापौरपदी भाजपचे सुरेश पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूरच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत ७० पैकी ३६ मते मिळवून भाजपचे सुरेश पवार, तर उपमहापौरपदी देविदास काळे निवडून आले. काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे आणि युनूस मोमीन यांना ३४ मते मिळाली. राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक राजा मणियार यांनी काँग्रेसला मतदान केले.
 
लातूर महापालिकेची गेल्या महिन्यात निवडणूक झाली होती. जुन्या पदाधिकाऱ्यांची मुदत एक महिना असल्यामुळे नव्या निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. भाजपकडून महापौर आणि उपमहापौरपदासाठी चार जणांनी अर्ज भरले होते. पीठासीन अधिकारी जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी सभा बोलावण्यात आली. त्या वेळी भाजपच्या तिघांनी अर्ज परत घेतले. त्यानंतर सभागृहात मतदान झाले. त्यामध्ये भाजपचे सुरेश पवार महापौरपदासाठी, तर देविदास काळे उपमहापौरपदासाठी निवडून आले. काँग्रेस आणि भाजपने व्हीप बजावल्यामुळे दोन्ही पक्षांच्या एकाही नगरसेवकात फाटाफूट झाली नाही. महापौर सुरेश पवार यांची निवड झाल्यानंतर जी. श्रीकांत यांनी त्यांच्याकडे सभागृहाची सूत्रे सोपवली.
 
स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी : भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सोमवारीच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी केल्या. त्यामध्ये भाजपकडून प्रकाश पाठक, गुरुनाथ मगे आणि अनंत गायकवाड यांचा समावेश आहे, तर काँग्रेसकडून चाँदपाशा घावटी आणि पुनीत पाटील यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...