आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Black Magic In Asti Taluka, Superstition Issue Police Case

आष्टी तालुक्यात भोंदूबाबाचा पर्दाफाश; शेतीत ओतला भोंदूगिरीचा पैसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- तंत्र-मंत्राच्या सहाय्याने दुर्धर आजार दूर करण्याचा दावा करणाºया पिंपरखेड येथील भोंदूबाबा बन्सी चव्हाण याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली असून 15 वर्षापासून त्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अंभोरा ठाण्यात त्याच्या विरूध्द जादूटोणा अंधश्रध्दाविरोधी सुधारीत कायदा 2013 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला. ग्रामस्थांकडून उकळलेला पैसा त्याने शेतीत हा ओतल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आष्टी तालुक्यातील पिंपरखेड गर्जेवस्तीवर तंत्र-मंत्राच्या सहाय्याने लोकांचे आजार ठीक करण्याचे गमजा करत पैसे उकळण्याचा धंदा बन्सी चव्हाणने सुरू केला होता. याची माहिती गावातील महिलांनी अंभोरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनराज गव्हाणे यांना दिली. पोलिसांनी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बन्सीच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडवर छापा टाकून त्याला पकडले.

न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे उपचारासाठी आलेल्या ग्रामस्थांचे पत्ते गोळा करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. उपचारांसाठी येणाºयांकडून तो पाच हजार रुपये घेत असे. याच पैशातून त्याने ट्रॅक्टर खरेदी केला. माळरानावरील दहा एकर शेतीतही त्यांने हा पैसा मुरवला. या भोंदूने याच पैशांतून दोन मुलींचे विवाह लावले, असे त्याच्याच मुलाने पोलिसांसमोर कबुल केले आहे. दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी बन्सीकडून विळा, लिंब, नारळ, अगरबत्ती, उद आदी साहित्य जप्त केले असून ते न्यायालयात जमा करण्यात येणार आहे.
त्याच्या कुटूंबीयाचीही चौकशी केली जाणार असून त्याला आणखी कोण मदत करत होते, याचाही तपास केला जात आहे, असे पोलिस निरीक्षक गव्हाणे यांनी सांगितले.

असे व्हायचे उपचार
बन्सी चव्हाण हा भोंदू बाबा त्याच्याकडे उपचारांसाइी येणाºयांवर तंत्रविद्येद्वारे उपचार करायचा. याच विद्येच्या माध्यमातून लिंब कापून टाकणे, नारळ फोडणे, उद जाळून त्याची राख आजारी व्यक्तीच्या अंगावर फेकून मंत्र पुटपुटणे, अशा प्रकारे उपचार चालायचे.

15 वर्षांपूर्वी दृष्टांत
बन्सी याच्या घराच्यासमोर मारोतीचे मंदीर आहे. 15 वर्षापूर्वी स्वप्नात त्याला मारोतीने दृष्टांत दिला, अशी बतावणी तो करतो. तू असे तांत्रिक उपचार कर, असा दृष्टांत झाल्याचे त्याने अंभोरा पोलिसांनी कोठडीतील चौकशीत सांगितले आहे. मात्र, हाही बनवाबनवीचाच प्रकार असावा, असा पोलिसांचा कयास आहे.

मुंबई,पुणेकरांना भुरळ
या भोंदूबाबाकडे 15 वर्षांपासून मुंबईसह पुणे, नाशिक येथून विविध आजार व गृहबाधांनी त्रासलेले नागरिक आष्टी तालुक्यातील पिंपरखेड गर्जेवस्ती येथे येत होते. पोलिसांनी शुक्रवारी छापा मारला तेंव्हा मुंबई येथील चार जण अशाच प्रकाराच्या उपचारांसाठी पत्र्याच्या शेडमध्ये बसून होते.

महिलांचे निनावी फोन
करणी, भानामती, भैरवसा काढण्यासाठी ग्रामस्थांकडून पैसे लुटण्याचा त्याचा गोरखधंदा सुरूच होता. पण, गावातील पाच महीलांनी धाडस करून अंभोरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक गव्हाणे यांना फोन केला. त्यामुळेच या भयानक प्रकाराला वाचा फुटली.