आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालातूर- लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील नळेगावात एसटी बसमध्ये झालेल्या स्फोटाचे गूढ उकलल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी म्हटले आहे. हा स्फोट शोभेच्या दारुमुळे झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
शोभेची दारु घेऊन जाणाऱ्या कैलास शिवराज आवकडे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातल्या मुरबाडमधून अटक केली. कैलाशच्या आजोबांच्या नावे शोभेच्या दारुचा परवाना आहे. उदगीरहून लातूरला निघालेल्या एसटी बसमध्ये (एमएच-20, डी-9253) शनिवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात १९ जण जखमी झाले होते. उदगीरहून बस आलेली असल्यामुळे याचा संबंध अनेकांनी जर्मन बेकरीतील आरोपी हिमायत बेगशी जोडला होता. तीव्रता मोठी असल्यामुळे स्फोटाचा आवाजही दूरवर गेला होता. त्यामुळे हा बॉम्बस्फोट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र, कैलास आवकडेला अटक झाल्यामुळे सर्व शंकाकुशकांना तिलांजली मिळाली असून पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.