आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध तरी संगीत विशारद, तबलावादनाची अंगी बाणली अफाट कला; जिल्हाभर गाजतेय मुळेंची कला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- तबल्यावर दोन्ही बोटं फिरल्यानंतर ‘तिरकिटधा’चा नाद कानी पडताच समाेरची व्यक्ती तबल्यामध्ये पारंगत असावी, असा समज होतो. पण, दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही खंडेराव मुळे हा अवलिया क्षणात अनेक नाद तयार करतो. त्यांचे कसब बघून अनेकांची बोटे आश्चर्याने तोंडात जातात. उमरगा तालुक्यातील कराळी येथे सामान्य कुटंुबात जन्मलेल्या मुळे यांची कहाणी थक्क करणारी आहे.

अभंग, भावगीत, गवळण, भारूड, भक्तिगीत, आंबेडकरी गीते, सगळ्यात कार्यक्रमात ते तबल्याची साथ देतात. मुळे यांना ही प्रतिभा कशी मिळाली, असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यांची तबलावादनाची सुरुवातच रंजक आहे. लहानपणी गावात घराशेजारी वास्तव्य करणाऱ्या एकनाथ पांचाळ यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम असायचा. मुळे यांनी अंध असूनही डोळस भक्तीतून पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संप्रदायाचा मार्ग धरला. खंडेराव मुळे यांनी लातूरच्या पंडित शांताराम चिगरी यांच्याकडे तबल्याचे पुढील शिक्षण घेतले. त्यांनी तबला अलंकार पदवी मिळविली. गायनातही त्यांनी संगीत विशारद पदवी प्राप्त केली. तबल्याची साथ, हार्मोनियमचे स्वरात मुळे यांचा संगीतमय कार्यक्रम ऐकणाऱ्यांच्या मनाला अक्षरश: भुरळ घालतो. मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘भीम निळाईच्या पार’, या गाण्याच्या कार्यक्रमातून महाराष्ट्रात १०० ठिकाणी सादरीकरण केले. त्यातून त्यांचे गायन, वादन आणि सादरीकरण अवघ्या महाराष्ट्राने अनुभवले. मुळे यांच्या या चमूने ‘आपलं घर’ या नळदुर्ग संस्थेतील मुलांसाठी राज्यभर ‘तारे समानतेचे’, हा गाण्याचा कार्यक्रम सादर केला. त्यातून  मोठ्या प्रमाणावर निधी जमा झाला. ही मदत संस्थेतील मुलांसाठी वापरण्यात आली. संस्थेचे मार्गदर्शक ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्यासह अनेकांनी मुळे यांच्यावर अनेकवेळा कौतुकाची थाप टाकली आहे.मुळे यांनी सध्या उस्मानाबादेत संगीत अकॅडमी सुरू केली असून ते नव्या मुला-मुलींना संगीताचे धडे देत आहेत.
 
संगीताकडे करिअर म्हणून पाहा
संगीत क्षेत्रात मला मिळालेला सन्मान बघून नवीन पिढीने या क्षेत्राकडे वळायला हवे, असे वाटते. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यंाप्रमाणे संगीतात प्रावीण्य मिळविलेल्या व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. मला संगीतामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळाली, असे मुळे सांगतात.
बातम्या आणखी आहेत...