आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोधले मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी लातुरात मोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - काटगाव आश्रमशाळेतील अल्पवयीन दलित विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्यावी व त्या आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, या मागणीसाठी शुक्रवारी येथील मातंग समाज अन्याय िनवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांना सादर करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

संजीवनी बोधले प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा. मुख्यमंत्री सहायता निधीतून संजीवनीच्या पालकांना २५ लाख रुपयांची मदत करावी तसेच नांदेड शहरात त्यांचे पुनर्वसन करावे, आश्रमशाळा व वसतिगृहात होणारे विद्यार्थ्यांचे शोषण थांबवावे, वसतिगृहावर महिला अधीक्षकांची नेमणूक करावी, िनवासी शाळांवर पोलिस िनयंत्रण ठेवावे, मुरूड, दापेगाव येथे दलित मुलींवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करावी, आंदोरा व लातूर येथील मातंग समाजावर अन्याय करणार्‍यांना कडक शासन करावे, संजीवनी बोधले प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस व वैद्यकीय अधिकार्‍यांना बडतर्फ करावे या मागण्या या वेळी करण्यात आल्या. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.