आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात प्राध्यापकांची पीएचडी बनावट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांतील सात प्राध्यापकांनी मेघालयातील शिलाँग येथील सीएमजे विद्यापीठाची बनावट पीएचडी घेतल्याचे उघडकीस आले आहे. विद्यापीठाने या बाबीची गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या उच्च शिक्षण विभागानेही या प्राध्यापकांची गंभीर दखल घेत माहिती मागवली आहे.
शिलाँग येथील सीएमजे विद्यापीठाने राज्यात औरंगाबाद, नागपूर, मुंबई येथे शाखा काढून बनावट पदव्या वाटपाचा धंदा सुरू केला. या विद्यापीठाच्या बनावट पीएचडी घेऊन राज्यातील नांदेड व सोलापूर विद्यापीठांतर्गत काही महाविद्यालयात प्राध्यापकांनी नियुक्त्या मिळवल्या. नांदेड विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांत सात प्राध्यापकांनी अशा पदवीच्या आधारे नियुक्त्या मिळवल्याचे उघडकीला आले आहे.
महाविद्यालयांकडून माहिती मागवण्यात आली : या प्राध्यापकांबाबत संबंधित महाविद्यालयांना चार दिवसांपूर्वीच पत्र पाठवण्यात आले आहे. पीएचडी तपासून अहवाल देण्यास सांगण्यात आले. दोषी असल्यास प्राध्यापकांची मान्यता रद्द करण्यात येईल, असेही महाविद्यालयांना कळवण्यात आले आहे, असे प्रभारी कुलगुरू डॉ. दिलीप उके यांनी सांगितले.

यांच्यावर आहेत आरोप
>विक्रांत विभुते (महाराष्ट्र उदयगिरी महा. उदगीर),
>दत्तात्रय जाधव (राजर्षी शाहू महा. लातूर),
>दिलीप कोरडे (वरपुडकर महा. सोनपेठ),
>वीणा कुलकर्णी (वरपुडकर महा. सोनपेठ),
>मारुती माने (अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय, राणीसावरगाव),
>सविता अवचार (बहिर्जी स्मारक महा. वसमत),
>विजयकुमार हांडे (दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजानी).