आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुस-याच्‍या नावावर 10 वीच्‍या परीक्षेला बसले विद्यार्थी, बाहेर काढले तर केली दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - जिल्हा परिषद कन्या शाळेत दहावीच्या पहिल्याच पेपरला दुसऱ्याच्या नावावर परीक्षा देणारे दाेन ते तीन विद्यार्थी अाढळून अाले असून त्यांना बाहेर काढण्यात अाल्यानंतर त्यांनी केंद्राच्या बाहेर जाऊन दुपारी १२ च्या सुमारास दगडफेक केली. यामुळे सर्वांचीच धांदल उडाली. प्रशासनाने पाेलिसांना ही माहिती दिली. पाेलिसांना दिल्यानंतर दगडफेक करणारे पसार झाले.

माजलगाव तालुक्यात मंगळवारपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेस सुरुवात झाली. तालुक्यात ९ केंद्रांवर ही परीक्षा सुरू असून या परीक्षेस ३५०० विद्यार्थी बसले आहेत. माजलगाव शहरातील कन्या शाळेत असलेल्या परीक्षा केंद्रावर ३५७ विद्यार्थी परीक्षा देत असून केंद्रावर बहि:स्थ १७ नंबरचा फाॅर्म भरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६५ अाहे. या विद्यार्थ्यांपैकी दोन ते तीन विद्यार्थ्यांच्या नावावर दुसरीच मुले परीक्षा देण्यास आल्याचे त्यांचे ओळखपत्र व हाॅलतिकीट तपासणीमध्ये आढळल्याने त्यांना केंद्राबाहेर काढले. याचा राग धरत त्यांनी बाहेर जाऊन केंद्रावर दगडफेक केली. दुपारी १२ च्या दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. या परीक्षा केंद्रावर पोलिस उपनिरीक्षक विकास दांडे व त्यांच्या पथकाने पाहणी केली असता विद्यार्थी पळून गेले होते. त्यानंतर परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती केंद्रप्रमुख एम. बी. चांदमारे व श्याम मिरगे यांनी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती उपनिरीक्षक दांडे यांनी दिली.
एका डेस्कवर दोन विद्यार्थी
पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी व्यवस्थित डेस्क नसल्याने तसेच एका डेस्कवर दोन विद्यार्थी, तर बाकांवर तीन-तीन विद्यार्थी बसवल्याने विद्यार्थ्यांना पेपर सोडविण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत होते. एक-दोन हाॅलवगळता इतर हाॅलमधील पंखे बंद होते, तर पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था व्यवस्थित नसल्याने विद्यार्थ्यांना सुविधाजनक वातावरणात परीक्षा देता येईल की नाही, अशी शंका उपस्थित होत होती.