आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोगस मतदान; दहा जणांना पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आष्टी - मतदान केंद्रात घुसून कर्मचार्‍यांना धमकी देत प्रक्रिया बंद पाडल्याप्रकरणी आंधळेवाडी (ता.आष्टी) येथील 15 जणांवर गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला. यातील दहा जणांना पोलिसांनी अटक केली असून आष्टी न्यायालयाने त्यांना 22 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आंधळेवाडीतील बूथ क्रमांक 213 वर गुरुवारी मतदान केंद्राध्यक्ष विकास गुणाजी आदमुने हे होते. सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात पंधरा जण घुसले. केंद्राध्यक्ष आदमुने यांनी त्यांना असे काही करू नका, असे सांगितले तरीही दमबाजी करत आम्ही सकाळपासून इमानदारीने मतदान केले. आता 50 मतदान करू द्या असे म्हणून ईव्हीएम ताब्यात घेऊन बोगस मतदान सुरू केले.

आठ मते बोगस : गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत 303 एवढे मतदान झाले होते. त्यानंतर ईव्हीएम मशीन तपासल्यानंतर मतदान 311 झाल्याचे दिसून आले. आठ मते बोगस आढळली आहेत. या प्रकरणी केंद्राध्यक्ष विकास आदमुने यांनी आष्टी ठाण्यात तक्रार दिली.