आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपूजेच्या खर्चावरून सख्ख्या भावाचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- बोअरच्या पाणीपूजेच्या खर्चावरून भावावर कोयत्याचे वार करून त्याचा खून केला. लातूर तालुक्यातील एकुर्गा येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बैलगाडीत घेऊन जात असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिलीप भीमराव घुट्टे (५०) असे आरोपीचे नाव आहे.

एकुर्गा येथे दिलीप व त्याचा भाऊ सतीश (३५) यांची शेती आहे. त्यांनी सामूहिक बोअर घेतला होता. बोअरला पाणी लागल्याने त्याचे जलपूजन केले होते. पूजेसाठीचा खर्च दिलीप याने केला होता. बोअर सामूहिक असल्याने पूजेसाठी झालेला अर्धा खर्च दे म्हणून त्याने त्याचा भाऊ सतीश याच्याकडे तगादा लावला होता. तथापि, सतीश
पैसे देण्यास नकार देत होता.
सोमवारी दुपारी हे दोघे भाऊ शेतात गेले. त्यावेळी दिलीप सतीशकडे आला व पूजेच्या पैशाची त्याने सतीशकडे मागणी केली. त्यास सतीशने नकार दिला त्यामुळे दिलीप भडकला. त्याने कोयत्याने सतीशच्या हात-पाय व छातीवर सपासप वार केले व यात सतीश जागीच ठार झाला. त्यानंतर आपले हे कृत्य कोणास कळू नये म्हणून त्याने सतीशच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते बैलगाडीत टाकले. दरम्यान, हा प्रकार ग्रामस्थांनी पोलिस पाटील बिभीषण घुट्टे यांना सांगितला. त्यांनी मुरूड पोलिसांना कळवले.
बातम्या आणखी आहेत...