आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Boy Died After Fall Down In Well For Water At Vida Tq Kej Dist Beed

पाणी शेंदताना मुलाचा विहिरीत पडून मृत्यू, केज तालुक्याच्या विडा गावातील दुर्दैवी घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज - आई-वडील मजुरीला गेल्यानंतर घरात पाणी भरण्यासाठी मोठ्या भावाबरोबर विहिरीवर गेलेल्या सचिन महादेव केंगार (१०) या बालकाचा पाणी शेंदताना विहिरीत पडून मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता ही घटना घडली.

केज तालुक्यातील विडा हे पाच हजार लोकसंख्येचे गाव दुष्काळामुळे पाणीटंचाईचा सामना करत आहे. महादेव केंगार हे गुरुवारी मजुरीसाठी गेले, तर त्यांच्या पत्नी आशाबाई भंगार वेचण्यासाठी घराबाहेर पडल्या. घरातील पाणी संपले असल्यामुळे गावात येणाऱ्या टँकरची वाट न पाहता आई- वडील घरी येईपर्यंत पाणी भरून ठेवावे, यासाठी त्यांचा मुलगा सचिन व मोठा भाऊ महेश हे दोघे गावाजवळील काळे यांच्या शेतातील विहिरीवर सायकलवर भांडे लावून पाणी आणण्यासाठी गेले होते. सायकल उभी करून सकाळी साडेआठ वाजता सचिन हा विहिरीतील पाणी शेंदत असतानाच अचानक त्याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला. लक्षात येईपर्यंत त्याची प्राणज्याेत मालवली होती.